34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रमुंबईत ३ दिवस पुरेल एवढेच डोस शिल्लक

मुंबईत ३ दिवस पुरेल एवढेच डोस शिल्लक

एकमत ऑनलाईन

मुंबईत : राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात मुंबईदेखील मागे नाही. मात्र, असे असताना मुंबईत लसींचा तुडवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. खुद्द मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. मुंबईत सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचे मिळून १ लाख ८५ हजार डोस शिल्लक आहेत. तसेच मुंबईला मिळणारा पुढचा लसींचा साठा हा १५ एप्रिलनंतर मिळणार आहे. त्यामुळे येत्या ३ दिवसांत मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असे पेडणेकर म्हणाल्या. तसेच यावेळी किशोरी पेडणेकर यांनी केंद्र सरकारकडून राज्याला सापत्न वागणूक दिली जात असल्याचीदेखील टीका केली आहे.

मुंबईतल्या लसीकरण कार्यक्रमाविषयी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबईत कोविशिल्ड लसींचे एकूण १ लाख ७६ हजार ५४० डोस शिल्लक आहेत. त्यासोबतच कोवॅक्सिन लसींचे ८ हजार ८४० डोस शिल्लक आहेत. मुंबईत आपण दररोज ५० हजार व्यक्तींना लसीचे डोस देत आहोत. मुंबईतच्या जम्बो कोविड सेंटर्समध्ये दिवसाला दीड ते दोन हजार लसींचे डोस दिले जात आहेत. त्यामुळे येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण होणार आहे.

महाराष्ट्राला सापत्न वागणूक
दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सह्याद्रीला नेहमीच केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. वरवर माया आणि पोटभर जेव ग बया असे केंद्र सरकारचे सुरू आहे. आम्ही जर लसीकरण करायचेय तर आम्हाला मिळायला तर पाहिजे ना, असे असे महापौर म्हणाल्या.

औरंगाबादमध्ये ऑक्सिजनच्या मागणीत चारपटीने वाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या