25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeमहाराष्ट्रमुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करा, राज्‍य सरकारचे रेल्‍वेला पत्र !

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करा, राज्‍य सरकारचे रेल्‍वेला पत्र !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२८ (प्रतिनिधी) देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची रक्तवाहिनी म्हणून ओळखली जाणारी उपनगरीय रेल्वेसेवा गेले सात महिने सर्वसामान्यांसाठी बंद आहे. मात्र प्रचंड हाल सोसत कार्यालयात पोचणाऱ्या मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी सुरू असलेली लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली करण्याची विनंती करणारे पत्र राज्य सरकारने रेल्वेला पाठवले आहे. त्‍यासाठी टाईम स्‍लॉटही तयार करण्यात आले आहेत.

लॉकडाउनमध्ये लोकल सेवा बंद करण्यात आली.त्‍यानंतर केवळ अत्‍यावश्यक सेवांमधील कर्मचा-यांसाठी लोकल सुरू करण्यात आल्‍या.नंतर मिशन बिगिन अगेन अंतर्गत विविध क्षेत्रांतील कर्मचा-यांसाठी लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली.आता ठरवून दिलेल्‍या वेळेत महिलांना देखील प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.मात्र अदयापही सर्वसामान्य प्रवाशांना सरसकट प्रवासाची परवानगी देण्यात आलेली नाही.कामासाठी बाहेर पडणा-या प्रवाशांची त्‍यामुळे मोठया प्रमाणात ससेहोलपट होत आहे.दिवसातील तीन ते चार तास हे शहरातील प्रवासातच जात आहेत.आता लोकल सर्वसामान्यांना खुली करावी असे पत्र राज्‍य सरकारने रेल्‍वेला लिहिले आहे.

त्‍यासाठी टाईम स्‍लॉट देखील सुचविण्यात आले आहेत.सर्वसामान्य व्यक्‍तीला पास किंवा तिकिटावर सकाळी पहिल्‍या लोकलपासून ते सकाळी साडेसातपर्यंत प्रवास करता येईल.अत्‍यावश्यक सेवेतील कर्मचारी क्‍यूआर कोड,पास,ओळखपत्रावर सकाळी ८ ते साडेदहा पर्यंत प्रवास करू शकतील.सर्वसामान्य व्यक्‍तीस सकाळी ११ ते दुपारी साडेचार पर्यंत प्रवास करता येईल.अत्‍यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना संध्याकाळी ५ ते साडेसातपर्यंत तर सर्वसामान्य व्यक्‍तीला रात्री ८ ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.लेडिज स्‍पेशल ट्रेन दर तासाला एक असा स्‍लॉट आहे.या स्‍लॉटला रेल्‍वेने अंतिम करून मंजुरी दिल्‍यानंतर सर्वसामान्य प्रवाशासाठी लोकल खुली होणार आहे.त्‍यासाठी लोकलच्या फे-या वाढविण्याची विनंतीही राज्‍य सरकारने केली आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्या ‘ऐतिहासिक’ कारकिर्दीचा पवारांकडून पुणेरी भाषेत गौरव !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या