मुंबई : काँंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे चांगलेच चर्चेत आले आहेत. लहान मुलांना सावरकर समजले पण त्या दिल्लीतल्या घोड्याला सावरकर कळत नाही, अशी जाहीर टीका त्यांनी केली होती. पोंक्षे यांच्या या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर विविध क्षेत्रातून टीका होत आहे. सोशल मीडियावरूनही त्यांना ट्रोल केले जात आहे. दरम्यान, सामाजिक विश्लेषक डॉ. विश्वंभर चौधरी यांनीही आता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
डॉ. चौधरी यांनी यासंदर्भात फेसबुकला एक पोस्ट केली आहे. यात ते म्हणतात, दहशतवाद विरूद्ध संविधान पोंक्षे या जाहीर चर्चेला. कधीही आणि कुठंही. नागपूरच्या संघ मुख्यालयात किंवा सनातनच्या गोव्याच्या मठात किंवा भाजपांकित कोणत्याही चॅनलवर कुठे ही या, शस्त्र घेऊन या, मी नि:शस्त्र येतो. तुम्ही मोदी-शहांचे दिल्लीचे पोलिस आणि फडणवीसांचे मुंबईचे पोलिस घेऊन या. मला भीती वाटत नाही, एकटा चालत चालत येतो. आहे का तयारी?, अशा खुले चॅलेंज त्यांनी दिले आहे.