22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeमहाराष्ट्रशिरसाठ यांच्या पत्राला सामान्य शिवसैनिकाचे खरमरीत उत्तर

शिरसाठ यांच्या पत्राला सामान्य शिवसैनिकाचे खरमरीत उत्तर

एकमत ऑनलाईन

मुंबई : मागच्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण राज्याच्या बाहेर गेलं आहे. म्हणजे गुजरात आणि गुवाहाटीच्या पंचातारांकित हॉटेलमधून राजकीय डावपेच आखत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे अनेक आमदार फुटल्यामुळे पक्षात अव्यस्थता आहे. मागच्या तीन दिवसांपासून बंड केलेल्या आमदारांनी मुख्यमंर्त्यांसह इतर नेत्यांवरती अनेक आरोप केले आहेत. संजय शिरसाठ यांनी मुख्यमंर्त्यांना लिहिलेल्या पत्रानंतर आता एक सामान्य शिवसैनिकाने संजय शिरसाठ खरमरीत पत्रातून उत्तर दिलं आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं असून त्याची चर्चा देखील केली जात आहे. काल मुख्यमंर्त्यांनी वर्षा हे निवासस्थान सोडल्यानंतर शिवसैनिक भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले होते.

आमचे वडील सांगतात आपण सक्रिय राजकारणात येण्याआधी रिक्षा चालक होता आणि आपणही हे अनेक वेळा जाहीररित्या बोलून दाखवले आहे. संभाजीनगर स्थानिक शिवसेना नेत्यांवर विश्वास ठेऊन आदरणीय ंिहदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला पक्षाच्या, लोकप्रतिनिधी पदाच्या अनेक जबाबदा-या दिल्या. आपण सर्वसाधारण रिक्षावालापासून 3 वेळेस आमदार झालात. शिरसाटजी हेच नाही तर आपण आपल्या मुलालाही आमची इच्छा नसताना आमच्यावर लादले. त्याचा भयानक त्रास सहन करूनही आम्ही मेहेनत करून जनतेच्या साथीने त्यालाही लायकी नसताना निवडणूक दिले. हे सगळं फक्त शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांच्या प्रेमाखातर…

संजय शिरसाट म्हणजे आमच्यासाठी फक्त शिवसेनेने दाखवलेला दगड याचा प्रत्यय तुम्हाला २०१९ सालच्या निवडणुकीत आला आहे. संजय शिरसाट या नावाला जनतेचा प्रचंड विरोध होता. जेव्हा तुमच्या विरोधात सगळे उभे होते आता तुम्ही ज्यांच्या सोबत ंिहदुत्वाच्या मुद्द्यावर सोबत जाणार आहात. त्या भाजपने राजू शिंदे नावाचा भाजपचा माजी उपमहापौर आपल्या विरोधात उभा केला. देवेंद्र फडणवीस स्वत: राजू शिंदेच्या संपर्कात होते. पैशांचा मोठा बाजार झाला अनेक दिग्गज मंडळीनी आपल्याला पाडण्यासाठी कंबर कसली होती. तुमच्याच जवळच्या सहका-यांनी सांगितले की आपणही निवडणूक काळात अनेक वेळा रात्रीच्या’’ वेळी रडलात, हतबल झालात

अगदी निकालाच्या आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही विजयाची आशा सोडली होती. पण निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी झालेला चमत्कार आपल्यासाठी सुद्धा आश्चर्यकारक होता याचे आम्ही सगळे शिवसैनिक साक्षीदार आहोत. तो सर्व चमत्कार फक्त आणि फक्त आपल्याला शिवसेनेचा दगड समजून केलेल्या शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे.शिवाजीनगर, पदमपुरा अशा अनेक भागातून आपल्याला लीड मिळालेली मत ही शिवसेनेची होती; संजय शिरसाटची नाही, हे संभाजीनगर पश्चिममधील प्रत्येक मतदार, शिवसैनिक सांगू शकतो. असो बोलण्यासारखं खूप काही आहे.

तुम्ही उद्धवसाहेब भेटत नाही म्हणता. काल त्यांनी, ते का भेटत नव्हते हे सांगितले. तुम्ही मतदारांना न भेटता अनेक ‘‘रात्री’’ मुंबईला कुठे घालवता याची कल्पना सर्वांना आहे. आपले अनेक कारनामे शिवसैनिकांनी पाठीशी घातले फक्त आणि फक्त शिवसेनेच्या आपुलकी पोटी. आमच्या जीवावर तुम्ही निवडून आलात. तर अमाच्याही भावना ऐकून घ्या. आम्ही शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय यांच्या सोबत आहोत आणि सदैव राहणार अजून जे काही मनात आहे ते येणा-या निवडणुकीत बोलू असं खरमरीत उत्तर एका सामान्य नागरिकाने दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या