28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्र‘राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद - संकल्पना, पद्धती’वर परिसंवादाचे आयोजन

‘राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद – संकल्पना, पद्धती’वर परिसंवादाचे आयोजन

एकमत ऑनलाईन

पुणे : राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद – संकल्पना, पद्धती’ या विषयावर एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत गुणवत्ता कक्ष आणि कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर नॅक मूल्यांकन समजून घेण्याच्या दृष्टीने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

शैक्षणिक परिसंवादात नॅकचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, आयसरचे डॉ. के. पी. मोहनन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. आर.एस. माळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या शैक्षणिक परिसंवादात पुण्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता व्यवस्था समितीचे समन्वयक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदाधिकारी व प्राध्यापक, माजी कुलगुरू यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता सुधार हेतूने या परिसंवादात महाविद्यालय मूल्यांकन संकल्पना व पद्धतीतील बदलाबाबत राष्ट्रीय स्तरावरील चर्चेला प्रारंभ होणार आहे.
हा परिसंवाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील नामदेव सभागृहात दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २.३० ते ५.३० या वेळात संपन्न होणार आहे अशी माहिती विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाच्या संचालक डॉ. सुप्रिया पाटील यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या