27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्र३ व ४ जून रोजी ३६ वी रिजनल कॉन्फरन्सचे आयोजन

३ व ४ जून रोजी ३६ वी रिजनल कॉन्फरन्सचे आयोजन

एकमत ऑनलाईन

पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कॉन्सिलतर्फे (डब्ल्यूआयआरसी) दोन दिवसीय ३६ वी रिजनल कॉन्फरन्स ३ व ४ जूनला आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती ‘डब्ल्यूआयआरसी’चे अध्यक्ष सीए मुर्तुझा काचवाला यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डब्ल्यूआयआरसी’चे उपाध्यक्ष सीए यशवंत कासार यांच्या संयोजनातून ही दोन दिवसीय कॉन्फरन्स होत आहे. पुण्यात पहिल्यांदाच रिजनल कॉन्फरन्स होत आहे. ‘भविष्यासाठी सज्ज सीए’ या संकल्पनेवरील या परिषदेचे उद्घाटन ३ जून रोजी पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक व मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे, ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए देबाशिष मिश्रा, उपाध्यक्ष अनिकेत तलाठी, माजी अध्यक्ष अमरजित चोप्रा यांच्या हस्ते होणार आहे. ‘सद्यस्थितीत जागतिक स्तरावर भारताला असलेल्या संधी’ यावर गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू डॉ. अजित रानडे मार्गदर्शन करणार आहेत. ‘भविष्यासाठी आपण सज्ज आहोत का?’ आणि ‘चौकटीबाहेरचा विचार : संधींचे भांडार’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. उद्योग व सनदी लेखापाल क्षेत्रातील तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत.

दुस-या दिवशी करप्रणालीवर सीए गिरीश अहुजा, जीएसटीमध्ये काय करावे व करू नये यावर अ‍ॅड. सीए व्ही. श्रीधरन, देशातील बदलते प्रशासनवर पी. आर. रमेश बोलणार आहेत. तसेच ‘भागीदारांच्या अपेक्षा आणि सीएंची भूमिका’ व ‘सद्यस्थितीतील भांडवली बाजार’ या विषयांवर चर्चासत्र होणार असून, विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कॉन्फरन्समध्ये सनदी लेखापाल क्षेत्रातील नवतंत्रज्ञान, विविध प्रणाली, त्याचे स्वरूप आदींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, असे सीए ऋता चितळे यांनी नमूद केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या