16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रअनाथालयातील मुलीवर शिर्डीत सामूहिक अत्याचार

अनाथालयातील मुलीवर शिर्डीत सामूहिक अत्याचार

एकमत ऑनलाईन

अहमदनगर : रागाच्या भरात अनाथालयातून निघून गेलेले एका तरुणीला (२९) शिर्डीत भयानक प्रसंगाला सामोरे जावे लागले. तिच्या बाबतीत जे काही घडले, ते उघडकीस यायलाही महिना लागला. रात्रीच्या वेळी तिला एकटीला पाहून काही तरुणांनी तिला जेवण देतो असे सांगून आपल्या खोलीवर नेले आणि तेथे सामूहिक अत्याचार केला. हा प्रकार आता उघडकीस आला असून नगरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात अत्याचारात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आरोपींना शोधण्याचे आणि पुरावे संकलित करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.

जुलै महिन्यात शिर्डीत ही घटना घडली आहे. त्यानंतर तरूणीवर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्यामुळे अनाथालयाच्या मदतीने नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर शहरातील एका अनाथालयात ही तरुणी राहते. जुलै महिन्यात रागाच्या भरात ती अनाथालयातून. १४ जुलै २०२२ रोजी निघून गेली. ती शिर्डीत मंदिराच्या परिसरात एकटीच राहत होती.

दिवाळीच्या आधी काही दिवस आधी रात्रीच्यावेळी काही तरुण तिच्याजवळ आले. तुला पोटभर जेवण देतो, असे सांगून ते तिला घेऊन गेले. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिचे हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबला. त्यानंतर पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केला. यानंतर या तरुणीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार सुरू होते. तिच्यावर अत्याचार झाल्याचे तसेच ती गरोदर असल्याचेही यावेळी लक्षात आले. शुद्धीवर आल्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी या तरुणीने नगरच्या एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी पाच अनोळखी आरोपींच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या