25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमहाराष्ट्रअनाथ, निराधार मुलांना मोठा दिलासा, वयाच्या २३ वर्षांपर्यंत आश्रमात राहता येणार

अनाथ, निराधार मुलांना मोठा दिलासा, वयाच्या २३ वर्षांपर्यंत आश्रमात राहता येणार

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) कोरोनाच्या संकटामुळे आधीच अडचणीत असलेल्या निराधार मुलांवर वयाच्या अटीमुळे डोक्यावरील छप्परही गमावण्याची वेळ आली होती. मात्र सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन वयाची अट दोन वर्षांनी शिथिल करण्याचा मोठा निर्णय राज्याच्या महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निर्देशानुसार घेतलेल्या या निर्णयामुळे या बालकांना अनुरक्षण गृहांमध्ये वयाच्या २३ वर्षांपर्यंत राहता येईल व अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, प्रशिक्षण आदी सुविधा मिळतील.

महिला व बालविकास विभागाअंतर्गत चालणाऱ्या बालगृहात अनाथ मुलांना १८ वर्षांपर्यंतच ठेवले जाते. त्यानंतर यातील काही मुले २१ वयापर्यंत अनुरक्षणगृहात राहू शकतात. मात्र कोरोनाच्या संकटामुळे गेले वर्षभर सर्व व्यवहार ठप्प असताना वयोमर्यादा ओलांडल्यामुळे अनुरक्षणगृहातील मुलांना तेथून बाहेर पडावे लागणार होते. विशेषतः निराधार तरुणींचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.या वृत्ताची दखल घेऊन कोरोनाच्या संकटामुळे वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून २३ वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ मधील तरतुदींनुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ, निराधार, संकटग्रस्त व अत्याचारित बालकांना पोलीस, स्वयंसेवी संस्था, पालक यांच्याकडून बाल कल्याण समितीमार्फत बालगृहात प्रवेश दिला जातो. या योजनेंतर्गत शून्य ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य सुविधा, शिक्षण, प्रशिक्षण आदी सुविधा पुरवल्या जातात. तसेच पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातात.

ज्या अनाथ, निराधार मुलांना संस्थात्मक काळजीची आवश्यकता आहे अशा मुलांसाठी अनुरक्षणगृह योजना १८ ते २१ वर्षे वयोगटातील बालकांसाठी राबविण्यात येते. अन्न, वस्त्र, निवारा आदी मूलभूत सोयीसुविधांसह त्याच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने शालेय व व्यावसायिक प्रशिक्षण या अनुरक्षण सुविधा दिल्या जातात. रोजगार मिळवून समाजात स्वःताच्या पायावर उभ्या राहिलेल्या बऱ्याचश्या मुलांचे रोजगार कोरोना आपत्ती काळात हीरावले गेले आहेत. अशा मुलांना आधार देण्यासाठी अनुरक्षण गृहात दाखल करुन घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

गंगाखेडला कच्चा बंधारा तोडून पाणी सोडले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या