24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रआपली लढाई संपलेली नाही, देवेंद्र फडणवीसांचे विशेष आभार

आपली लढाई संपलेली नाही, देवेंद्र फडणवीसांचे विशेष आभार

एकमत ऑनलाईन

नाशिक : ओबीसी आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून लढा देत असलेले आमदार छगन भुजबळ यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. या पार्श्वभूमीवर ते नाशिकमध्ये आज दाखल झाले. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत विशेष आभार देवेंद्र फडणवीसांचे मानले आहेत.

ओबीसींचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून पूर्ववत करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु देशातील इतरही राज्यांत ओबीसींचा प्रश्न सोडवावा लागणार असल्याने आरक्षणाची लढाई संपलेली नाही, असे भुजबळ म्हणाले.

भुजबळ यावेळी म्हणाले, आरक्षण मिळाले, मात्र आपली लढाई संपलेली नाही, ज्या अहवालामध्ये माहिती मिळवली आहे, त्यात ६० टक्के ओबीसी असताना काही गावांमध्ये ० टक्के ओबीसी दाखविण्यात आले आहेत. अनेक त्रुटी आहेत, त्यावर काम करावे लागणार आहे. याच्यापुढची लढाई, पूर्ण आरक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात लढाई करावी लागेल. भारत सरकारला विशेष विनंती असेल की महाराष्ट्राचा प्रश्न सुटला पण देशातील इतरही राज्यांतील ओबीसींचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी भुजबळांनी केली आहे.

ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे विशेष योगदान आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये समता परिषदेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासूनचा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अखेर सुटला. काल सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे यासाठी सुनावणी पार पडली. त्यात महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसींसाठी आजचा दिवस आनंदाचा असल्याचे आणि हा महाविकास आघाडीचा विजय असल्याचे प्रतिपादन आमदार छगन भुजबळ यांनी केले. तद्नंतर आज ते नाशिकमध्ये आले आहेत. यावेळी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, सरकार येतात-जातात, मात्र राज्यातील मागासवर्गीय नागरिक आणि त्यांना मिळणा-या सुविधा, तसेच मिळणारे सरकारी फायदे, हे फायदे मिळवण्यासाठी अनेक वर्षे लढाई करावी लागते, तेव्हा कुठे न्याय मिळतो. ओबीसी आरक्षणासाठी देखील अशाच पद्धतीने लढाई करावी लागली.

मग मंडल आयोगाचा अहवाल आला, तो मान्य झाला, अनेकवेळा तो कोर्टात गेला आणि त्यातून ओबीसींना शैक्षणिक, नोकरीत आरक्षण मिळाले. त्यानंतरच्या काळात जगभरात कोरोनाचे संकट आले. तत्पूर्वी फडणवीस सरकारच्या काळात देखील ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न झाले. त्यांनी देखील इम्पिरिकल डेटासाठी केंद्रात धाव घेतली होती. तो मिळाला नाही.
नंतर महाविकास आघाडी सरकार आले. यावेळी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो.

आम्ही देखील इम्पिरिकल डेटासाठी केंद्रात गेलो. केंद्राने सांगितले, डेटा आहे पण ओबीसींचा नाही, मग आयोग नेमला, पंधरा दिवसांत काम करायला सांगितले, तो फेटाळला, मग चार महिन्यांनंतर अहवाल आला आणि तो मंजूर झाला. अशा पद्धतीने ओबीसी आरक्षणाचे ९९ टक्के काम हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले.

त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या लढ्यातील सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारचे आभार मानतो आणि विशेष आभार फडणवीस साहेबांचे, असे सांगून भुजबळांनी ओबीसी आरक्षणाचा प्रवास थोडक्यात अधोरेखित केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या