26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रअन्नधान्य, डाळींसह पॅकिंग वस्तू महागणार

अन्नधान्य, डाळींसह पॅकिंग वस्तू महागणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : केंद्र सरकारने गुरुवारी काढलेल्या जीएसटीच्या अधिसूचनेमुळे सर्वसामान्यांचा खर्च पुन्हा एकदा वाढणार आहे. आतापर्यंत जीएसटीच्या कक्षेबाहेर असलेले ब्रँड नसलेले प्री-पॅक केलेले अन्नधान्य, डाळी आणि तृणधान्ये तसेच प्री-पॅक केलेले दही, बटर मिल्क आणि लस्सी यांच्यावर पाच टक्के कर लावला जाणार आहे. या सर्व गोष्टी स्थानिक किराणा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जातात.

केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी शनिवारी एक दिवसाचा संप पुकारला आहे. ह्लआम्ही या निर्णयाचा देशभरात निषेध करणार आहोत. जीएसटी आयुक्तांना अनेक प्रश्न उपस्थित करत निवेदन दिले आहे.ह्व, असे धान्य, तांदूळ आणि तेलबिया व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शरद मारू यांनी सांगितले.

या निर्णयामुळे धान्य आणि डाळींच्या किमती ५ टक्के नव्हे तर ८-१० टक्के वाढू शकतात. एका व्यापा-याने सांगितले, ह्ललहान दुकानदारांना रिटर्न भरण्यासाठी तज्ञांची नियुक्ती करणे आणि जीएसटी क्रमांक मिळाल्यावर त्यांना सेवा शुल्क भरावे लागेल.
दूध उत्पादक हा भार ग्राहकांवर टाकतील. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केंिटग फेडरेशन(अमूल )चे व्यवस्थापकीय संचालक आर एस सोधी यांनी टाइम्स ऑफ इंडियालाला माहिती दिली की ते १८ जुलैपासून ५ टक्के दर वाढवतील.

दर वाढीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. हा अतिरिक्त खर्च आम्ही सहन करू शकत नाही. पण मला असे वाटते की दही, बटर मिल्क आणि लस्सी सामान्य माणूस खातात. या चैनीच्या वस्तू नाहीत. शिवाय, स्थानिक किरकोळ विक्रेत्यांना दररोज दोनदा ताजे डिलिव्हर केले जाते. त्यामुळे ई-वे बिंिलगचे ओझे वाढेल. व्हॉल्यूम जास्त असले तरीही नफ्याचे मार्जिन कमी आहे. छोट्या विक्रेत्यांना आता मासिक जीएसटी रिटर्न भरण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करावी लागेल आणि हे त्रासदायक आणि खर्चिक असेलह्व, असो सोधी म्हणाले.

मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबलचे एमडी मनीष बंदलीश म्हणाले, ह्लयाचा परिणाम ग्राहकांवर होऊ शकतो.ह्व गोवर्धन डेअरी, जी एक खाजगी ब्रँड आहे आणि सहकारी नाही, आधीच आम्ही ५ टक्के ॠरळ भरतोय आणि प्रतिस्पर्ध्यांवर कराचे स्वागत करते. पराग मिल्क फूड्सचे चेअरमन देवेंद्र शाह म्हणाले, ह्लआता सर्व खेळाडू एकच व्यासपीठ सामायिक करतील, निरोगी स्पर्धा वाढवतील.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या