22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रतुकोबारायांच्या दिंडीत पटोलेंकडून पांडुरंगाचा जयघोष

तुकोबारायांच्या दिंडीत पटोलेंकडून पांडुरंगाचा जयघोष

एकमत ऑनलाईन

सोलापूर : पांडुरंगाची आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्तिपर्वाचे चालते-बोलते रूप. या वारीत सहभागी होण्याचा आणि इथल्या भक्तीनादात दंगण्याचा मोह सा-यांनाच होतो. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मंगळवारी या वारीत सहभागी होत पांडुरंगाच्या नामाचा जयघोष केला.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या दिंडीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. अकलूज येथे ही दिंडी आली असता, नाना पटोले या सोहळ्यात सहभागी झाले.

पटोले वारक-यांच्या वेशात आले. डोक्यावर पांढरीशुभ्र टोपी, कपाळावर अष्टगंध आणि बुक्का, गळ्यात टाळ. वारक-यांनी अभंग सुरू करताच पटोलेंची पावले यावेळी थिरकली. ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात त्यांनीही या भक्तिरसाचा आनंद लुटला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या