23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeमहाराष्ट्रभाजप ओबीसी मोर्चाच्या बैठकीला पंकजा मुंडे, बावनकुळे गैरहजर

भाजप ओबीसी मोर्चाच्या बैठकीला पंकजा मुंडे, बावनकुळे गैरहजर

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१९ (प्रतिनिधी ) पक्षाकडून सातत्याने होणाऱ्या उपेक्षेमुळे नाराज असलेल्या माजी मंत्री व भाजपा नेत्या पंकजा मुंडे, तसेच माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे भाजपातील अंतर्गत कलह आज पुन्हा चव्हाट्यावर आला. दरम्यान या बैठकीत बोलताना माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल्याचा आरोप केला.

भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक आज झाली. या बैठकीत ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह या बैठकीस मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार संगम लाल गुप्ता, आमदार आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आमदार डॉ. संजय कुटे, अतुल भातखळकर, योगेश टिळेकर यावेळी उपस्थित होते.वरीष्ठ नेते बैठकीला उपस्थित होते. परंतु राज्य भाजपचे ओबीसी चेहरे अशी ओळख असलेल्या माजी मंत्री व पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, तसेच प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे हेच प्रमुख नेते बैठकीला उपस्थित नव्हते.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याची रणनीती ठरवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीला प्रमुख नेत्यांची गैरहजेरी ठळकपणे जाणवली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खा. प्रीतम मुंडे यांचा समावेश न होणे व त्यापेक्षाही विश्वासात न घेता डॉ.भागवत कराड यांचा समावेश केल्याने पंकजा मुंडे नाराज आहेत. यामुळे त्यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रही सुरू केले होते. आपण नाराज असलो बंड करणार नाही, असे स्वतः पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले असले तरी आजच्या बैठकीकडे पाठ फिरवून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपाच खरा ओबीसी पक्ष -फडणवीस
दरम्यान बैठकीत बोलताना फडणवीस यांनी भाजपच खरा ओबीसींचा पक्ष असल्याचे सांगितले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात एवढ्या मोठया प्रमाणात ओबीसी नेत्यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात बहुजनांचे राज्य असल्याचे फडणवीस म्हणाले.

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेणे आवश्यक असताना आघाडीच्या नेत्यांची केवळ पोपटपंची सुरू आहे. खोटं बोल पण रेटून बोल, असे सुरू आहे. आपल्या चुकीमुळे राजकीय आरक्षण गेले याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळेच त्यांचे बोलके पोपट बोलत आहेत. यांच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेले, अशी टीका फडणवीस यांनी केली.

डॉक्टरांनी केला नव तंत्रज्ञानाचा अविष्कार ; जुळ्यांसह पॅपराशिअस बाळाचा जन्म

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या