23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडेंनी घेतले फडणवीसांच्या गणपतीचे दर्शन

पंकजा मुंडेंनी घेतले फडणवीसांच्या गणपतीचे दर्शन

एकमत ऑनलाईन

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात सारे काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले. पंकजा मुंडे यांना सुरुवातीला विधान परिषद उमेदवारी आणि आता मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सातत्याने पुढे येत आहे. अशातच काल (गुरुवारी) त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या गणरायाचे दर्शन घेतले.

मागच्या अडीच वर्षांत राज्यसभा, विधान परिषद आणि परवाच्या मंत्रीमंडळ विस्तारात नावाची चर्चा असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना संधी मिळाली नाही. आता पुन्हा मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा आहे. आता तरी पंकजा मुंडे यांना संधी मिळेल का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीचे दर्शन घेतले आहे. त्यामुळे दोघांमधील कटुता कमी होईल का? असे सवाल कार्यकर्यांमध्ये उपस्थित होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या