24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रपानसरे हत्या प्रकरण, सुनावणी लांबणीवर

पानसरे हत्या प्रकरण, सुनावणी लांबणीवर

एकमत ऑनलाईन

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयितांवरील आरोप निश्चितीबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आज कोल्हापूर न्यायालयात झालेल्या सुनावणीत हत्या प्रकरणातील संशयित न्यायालयात हजर होते. या प्रकरणी आता ६ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. पुढील सुनावणीवेळी एटीएस आणि एसआयटी या दोन्ही यंत्रणांच्या तपास अधिका-यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास आता महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून करण्यात येणार आहे. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणा-या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने या प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रे दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवली आहेत. कोल्हापूरमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर मॉर्निंग वॉकदरम्यान १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळ््या झाडण्यात आलेल्या. उपचार सुरू असताना काही दिवसांनी कॉम्रेड पानसरे यांचे निधन झाले. कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीच्या विशेष पथकाकडून सुरू होता. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाला हत्येला ७ वर्षे उलटूनही कोणतीही मोठी प्रगती करता आली नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या