24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रपरब यांचे रिसॉर्ट जमीनदोस्त होणार

परब यांचे रिसॉर्ट जमीनदोस्त होणार

एकमत ऑनलाईन

रत्नागिरी : शिवसेना नेते व माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांचे वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिका-यांना कारवाईचे आदेश दिले. याबाबत मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी बैठकीनंतर दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला पुन्हा धक्का दिला आहे. त्यांनी अनिल परब यांचे दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट पाडावे या फाईलवर सही केली आहे. यावर आज मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. जिल्हास्तरीय कोस्टल झोन मॉनिटरिंग कमिटीची जिल्हाधिका-यांसोबतची बैठक संपली आहे. त्यानंतर केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ बी. एन. पाटील यांनी दिली. सी कॉन आणि साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आला आहे. रिसॉर्ट पाडसंदर्भात बांधकाम विभागाला नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.

समुद्र किना-यावर भव्य रिसॉर्ट
अनिल परब यांचे दापोली-मुरुड समुद्र किना-यावर भव्य साई रिसॉर्ट उभारलेले आहे. नियमांचे उल्लंघन करून बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खूप पूर्वी केला होता. यावरून त्यांनी अनेकदा धरणे आंदोलनही केले. या संदर्भातील सर्व कागदपत्रेही सोमय्यांनी सरकारला सादर केली होती. त्यानंतर आता रिसॉर्ट तोडण्याचा आदेश देण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या