25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमहाराष्ट्रपरमबीर सिंगांनी बुकीकडून उकळले ३.४५ कोटी रुपये

परमबीर सिंगांनी बुकीकडून उकळले ३.४५ कोटी रुपये

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर होत असलेल्या आरोपांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणींत वाढ होत आहे. पोलिस अधिका-यांनंतर आता एका क्रिकेट बुकीने परमबीर सिंग यांच्यावर वसुलीचे आरोप केले आहेत. सिंग यांनी २०१८ मध्ये ३ कोटी ४५ लाख रुपयांची वसुली केल्याचा बुकीचा आरोप आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वी अनुप डांगे आणि अकोल्याच्या एका पोलिस अधिका-याने सिंग यांच्या विरोधात गंभीर आरोप करणारी पत्रे मुख्यमंत्र्यांना लिहिली होती. त्यामुळे सिंग यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि राज्य सरकार यांच्यातील वाद हायकोर्टापर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर परमबीर सिंग यांच्या विरोधात एका पाठोपाठ एक लेटरबॉम्ब समोर येत आहेत. सोमवारी तर चक्क क्रिकेट बुकी सोनू जलाल याने परमबीर सिंग यांच्यावर आरोप केले आहेत. सिंग यांनी वसुली केल्याचा आरोप बुकी सोनू जलालने केला आहे. जलालने याबाबत पोलिस महासंचालक संजय पांडे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांना लेखी पत्र लिहून तक्रार केली आहे.

जलाल याने लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंग यांनी २०१८ मध्ये ३ कोटी ४५ लाख रुपयांची वसुली केली होती, असा आरोप केला आहे. मकोका गुन्हा लावून खंडणी वसूल केल्याचे या पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे या पत्रात प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय केतन तन्ना यांनीही परमबीर सिंग यांच्यावर वसुलीचा आरोप केला आहे. सव्वा कोटी रुपयांची वसुली केल्याचा त्यांनी दावा केला. परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी या पत्रातून केली आहे.

तक्रारीची गंभीर दखल
या प्रकरणाची दखल गृहखात्याने तात्काळ घेतली असून डीजीपी ऑफिसमधून हे प्रकरण स्टेट सीआयडीला वर्ग केल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली. त्यामुळे आता आणखी एका प्रकरणात परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आरबीआयने आयसीआयसीआय बँकेला ठोठावला तीन कोटींचा दंड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या