34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रसचिन वाझेच्या नियुक्तीसाठी परमबीर सिंग यांची शिफारस

सचिन वाझेच्या नियुक्तीसाठी परमबीर सिंग यांची शिफारस

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईत मायकल रोडवर स्फोटकांनी गाडी सापडल्या प्रकरणी अटकेत असलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाला आता नवीन वळण लागले आहे. सचिन वाझे यांच्या नियुक्तीची शिफारस ही मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनीच केली होती, हे आता पत्रासह समोर आले आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

सचिन वाझे निलंबित असताना त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. याबद्दल तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी २५ मे २०२० रोजी पत्र लिहून सचिन वाझे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी पत्राद्वारे केली होती. त्यांच्या शिफारसीनंतर सचिन वाझे यांची गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. हा विभाग मुंबई क्राईम ब्रँचच्या अंर्तगत येतो. त्यामुळे सचिन वाझे यांचे डिटेक्शन क्राईम ब्रँचचे उपायुक्त प्रकाश जाधव, जॉईंट सीपी मिलिंद भारंबे हे वरिष्ठ होते. त्यांना रिपोर्ट करणे वाझे यांना बंधनकारक होते. मात्र, सचिन वाझे हे थेट तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या संपर्कात होते.

परमबीर सिंग यांची एनआयएसमोर हजेरी
आज परमबीर सिंग यांना दक्षिण मुंबई येथील कार मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेल्या गाडी पार्क प्रकरणी चौकशीला एनआयएची पायरी चढावी लागली. परमबीर सिंग यांच्यासह अनेक बड्या पोलिस अधिका-यांच्या अडचणीत वाढ झाली. आज साधारणपणे सकाळी साडेनऊच्या सुमारास परमबीर सिंग हे चौकशी करता एनआयएच्या मुंबई कार्यालयात हजर झाले. एनआयए सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच परमबीर सिंग यांना एनआयएने चौकशी करता समन्स बजावला होता. याच बरोबर त्यांना त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपातदेखील आणण्यास सांगितले होते. परमबीर सिंग यांची चौकशी एनआयएचे उच्चाधिकारी करत आहेत.

परमबीर सिंगांच्याही अडचणी वाढणार?
सचिन वाझे निलंबित असताना त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. सचिन वाझे यांच्या नियुक्तीची शिफारस ही मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनीच केली असल्याचा दावा आता एका पत्राच्या आधारे केला जात आहे. त्यामुळे परमवीर सिंगही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा रद्द

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या