21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeमहाराष्ट्रकोओपरेटीव्ह बँकासंदर्भात पवारांची पंतप्रधानांशी चर्चा

कोओपरेटीव्ह बँकासंदर्भात पवारांची पंतप्रधानांशी चर्चा

एकमत ऑनलाईन

मुंबई : दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शनिवार दि़ १७ जुलै रोजी भेट झाली. ते जवळपास १ तासाहून अधिक काळ या बैठकीत होते. यावरून नको ते तर्कवितर्क होत असल्याने शरद पवार यांनी कोओपरेटीव्ह बँकासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले़

शरद पवार यांनी काल शुक्रवारी पियुष गोयल यांच्याशी भेट घेतली होती. त्यानंतर ते राजनाथ सिंह यांनाही भेटले होते. आणि आता ही नरेंद्र मोदींची भेट त्यांनी घेतली आहे. यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे.

वेगवेगळ्या राज्यातील सरकारे आपापल्या पद्धतीने कोरोनाचे नियम बनवत असताना विरोधकांकडून चुकीच्या पद्धतीने राजकारण केले जात आहे. त्यामुळे, एक नॅशनल पॉलिसी बनवली जावी, अशी मागणी केली जात होती. जर अशी एक पॉलिसी बनवली गेली तर कोरोना काळातील राजकारण कमी होऊ शकते. यासंदर्भातच पवार यांनी मोदींशी चर्चा केली.

आरबीआयचे अधिकार वाढल्याने चर्चा
आज शरद पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्या बैठकीत कोओपरेटीव्ह बँकासंदर्भात केंद्र सरकारने जो कायदा केला आहे़ त्यासंदर्भात चर्चा झाली. या कायद्यान्वये बँकाचे अधिकार कमी होऊन आरबीआयचे अधिकार वाढले आहेत. त्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.

बैठकीनंतर गैरसमज परसवण्याचे प्रयत्न
या मीटिंगनंतर गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न केले गेले. विरोधक पवारांना भेटले म्हणून गैरसमज पसरवले जात असून ते चुकीचे आहेत. हे सगळा घटनाक्रम काँग्रेसच्या माहितीत झाला आहे. ही मीटिंग अचानक झालेली नाही. ही भेट पूर्वनियोजित होती. शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांसोबत कोणतीही बैठक झालेली नाही.

कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या