27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeमहाराष्ट्रपवार साहेब महाराष्ट्राची शान : नवनीत राणा

पवार साहेब महाराष्ट्राची शान : नवनीत राणा

एकमत ऑनलाईन

अमरावती : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. राजकारणाच्या क्षेत्रात कोणी शरद पवारांचा हातही धरू शकत नाही, असे मत नवनीत राणा यांनी व्यक्त केले.

आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत. महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट इथून तिथे गेली असेल, तर ते फक्त शरद पवारच करू शकतात. एनिथिंग इज पॉसिबल, ते सगळ्यात सीनिअर नेते आहेत. आणि राजकारणाच्या क्षेत्रात कोणी त्यांचा हातही धरू शकत नाही. त्यामुळे जे होईल ते शरद पवारांच्या इच्छेनुसार होईल.’असे मत नवनीत राणा यांनी व्यक्त केले.

नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष खासदार आहेत. मात्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांचा गौरव करत मोदींना पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी येत्या काही काळात शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होतील, अशा बातम्या गुरुवारी दिवसभर माध्यमांमध्ये येत होत्या. मात्र या बातमीचे खंडन करत यामध्ये तथ्य नसल्याचे स्वत: शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे़

हरयाणामधील भाजप सरकारवर टांगती तलवार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या