24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रपवार, आव्हाडांपाठोपाठ आदित्य ठाकरेंनाही धक्का देणार?

पवार, आव्हाडांपाठोपाठ आदित्य ठाकरेंनाही धक्का देणार?

एकमत ऑनलाईन

मुंबर्ई : राज्यातल्या अभूतपूर्व सत्तासंघर्षानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर त्यांनी धक्कातंत्र अवलंबले आहे. बंड करून शिवसेनेचे बहुसंख्य आमदार फोडत शिंदेंनी ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला पहिला दणका दिला. त्यानंतर त्यांनी हे धक्कातंत्र सुरूच ठेवले आहे. आता त्यांनी आपला मोर्चा आदित्य ठाकरेंकडे वळविला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण मंत्री असताना म्हाडा संदर्भातले सर्व शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. तसेच गृहनिर्माण विभागाशी संबंधित सगळे निर्णय म्हाडा आणि विभागीय मंडळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या पाठोपाठ आता आदित्य ठाकरे यांनी सत्तेत असताना घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देणार असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पर्यावरण विभागाचा आढावा घेतला जात आहे. यावेळी शिंदे सरकार आदित्य ठाकरेंना धक्का देण्याची शक्यता आहे. पर्यावरण विभागातल्या अनेक कामांना स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना ज्या कामांचे टेंडर मंजूर करण्यात आले होते, ते रद्द करण्याची तयारीही शिंदे सरकारने दाखवली आहे.

बारामतीचा बिबटया प्रकल्प निसटला
शिंदे फडणवीसांच्या या सरकारने अजित पवारांनाही मोठा धक्का दिला आहे. बारामतीमध्ये बिबट्या सफारी प्रकल्प उभारण्याचा निर्णय पवारांनी घेतला होता. मात्र त्याला चांगलाच विरोध होत होता. त्यानंतर हा प्रकल्प जुन्नरमध्ये उभारण्याची मागणी राबवण्यात आली होती. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी बारामतीऐवजी हा प्रकल्प आता जुन्नरमध्येच उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या