23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रविकासाच्या नावाखाली जनतेला गूळ दाखवण्याची पवारांची जुनी परंपरा

विकासाच्या नावाखाली जनतेला गूळ दाखवण्याची पवारांची जुनी परंपरा

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे. मध्य प्रदेशमध्ये आरक्षण मिळते मग महाराष्ट्रात का नाही?, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शरद पवार यांनी विकासाच्या नावाखाली जनेतेला गूळ दाखवला आहे. फसवणूक करणे आणि गूळ दाखवणे ही त्यांची परंपरा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ओबीसी समाज आता याला बळी पडणार नाही.

कारण महाविकास आघाडी सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही हे समाजाला कळल्याने ते भडकले आहेत, म्हणून त्यांनी हे आंदोलन छेडले आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

ते म्हणाले, ओबीसी समाजाचा महाविकास आघाडी सरकारवर राग आहे. आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी समाजाची फसवणूक केली असल्याचे ओबीसींना माहिती झाले आहे. त्यामुळे त्यांनी आता भाजपला आरक्षण मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे. ओबीसी समाजाच्या मनामध्ये राग आहे. तो व्यक्त करण्यासाठी आणि सरकारला जाब विचारण्यासाठी आज ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. भाजपाने यावर मार्ग काढावा यासाठी समाजाने विनंती केली आहे. यावेळी भाजपाकडून मविआचा निषेध करण्यात आला

पुढे ते म्हणाले, मध्य प्रदेश सरकारने त्रिस्तरीय चाचणी ताकदीने पूर्ण करून दिल्या आहेत. आरक्षणासंदर्भातील तरतुदी न्यायालयाला पटवून देऊन पुन्हा ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळवले आहे. यापूर्वी वेळ असूनही या चाचणी संदर्भात महाराष्ट्र सरकारने दोन वर्षांपूर्वी पावले उचललेली नाहीत. जनतेचा भाजप आणि फडणवीसांवर विश्वास असल्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी भाजपने आंदोलन केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या