21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रलोढांना मंत्रीपद दिल्याने पेडणेकर संतापल्या

लोढांना मंत्रीपद दिल्याने पेडणेकर संतापल्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : मंगलप्रभात लोढा यांना मंत्रीपद दिल्यावरून किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मी अभिनंदन करते. मराठी मुंबईतून त्यांनी मंगलप्रभात लोढा यांना मंत्रीपद दिलं. अर्थात हा त्यांच्या पक्षाचा अजेंडा आहे. पण आमच्याकडून गेलेला आणि शिवसेना आमची आहे असं म्हणणारा मुंबईतला एकही आमदार मंत्री होऊ शकला नाही. ही मुंबईची शोकांतिका आहे’, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊन महिना उलटल्यानंतर अखेर मंगळवारी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. मात्र, अपक्ष आणि मित्रपक्षांना सहभागी करून घेतलं नसल्यामुळे त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. ‘प्रहार’ संघटनेचे बच्चू कडू यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना नव्याने शपथ घेतलेल्या मंत्र्यांवर टीका केली आहे. विशेषत: शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गटात दाखल झालेल्या आमदारांना त्यांनी लक्ष केलं आहे.

‘‘जे मंत्री झाले, त्यांचा पाळणा वेगवेगळ्या पक्षात हाललेला पाहायला मिळाला आहे. ते आमच्याकडे आले, तेव्हा त्यांचा शिवसेनेने बहुमान केला. आजही शिवसेना आमची, धनुष्यबाण आमचे, बाळासाहेब देखील आमचेच म्हणायचे पण शपथ घेतल्यानंतर एकाही मंत्री महोदयांना वाटले नाही की बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जावे.याचा अर्थ फक्त स्वत:च्या फायद्यासाठी बाळासाहेब वापरायचे. त्यांचं नाव वापरायचं’’, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
‘‘बाळासाहेबांच्या ठाकरे घराण्याला संपवायचं कसं? याचा विडा सगळ्यांनी उचलला आहे’’, असा दावा देखील किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या