मुंबई : पुढे ज्या काही घडामोडी घडणार आहेत ते आपल्याला काही काळातच दिसून येईल असं सुचक वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्भूमीवर दानवे यांचं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण स्पष्ट झाले आहे. लोक आता या सरकारला कंटाळले आहेत. पुढच्या काही घडामोडी घडणार आहेत ते आपल्याला काही काळातच दिसून येतील असे दानवे म्हणाले.
विधान परिषद निवडणुकीत महविकास आघाडीची मते फुटली आहेत. आघाडी सरकारमध्ये बेबनाव असल्यानं जनतेच्या प्रश्नाकडं संपूर्ण दुर्लक्ष असल्याचेही दानवे यावेळी म्हणाले. विधानपरिषदेच्या या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण स्पष्ट झाले असून लोक आता या सरकारला कंटाळले आहेत. या सरकारचे जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. जनतेकडं दुर्लक्ष झाल्याचे दानवे म्हणाले.