21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रफडणवीसांच्या बॅनरवरून अमित शहांचा फोटो गायब

फडणवीसांच्या बॅनरवरून अमित शहांचा फोटो गायब

एकमत ऑनलाईन

नागपूर : महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन करण्यात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. त्यामुळे तेच मुख्यमंत्री अशी चर्चा असताना ऐनवेळी फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांची नाराजी आज पुन्हा एकदा नागपुरात पाहायला मिळाली.

फडणवीसांच्या स्वागतासाठी आणि रोड शोसाठी लावण्यात आलेल्या बॅनरमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो गायब होता. बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, नितीन गडकरी आणि चंद्रकांत पाटील यांचे फोटो आहेत. त्यामुळे फडणवीस समर्थक अमित शहा यांच्यावर नाराज असल्याचे अधोरेखित झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या