संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात वाळूची अवैध तस्करी सुरू आहे. अशातच आज पहाटे वाळूची गाडी खोल खड्ड्यात पडून तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा गावात ही घटना घडली आहे. तालुक्यातील प्रवरा आणि मुळा नदीतून सध्या राजरोसपणे वाळू तस्करी सुरू आहे. तालुक्यातील हिवरगाव पावसा शिवारातील खंडोबा मंदिराजवळ आज पहाटे टाटा पिकअप 207 या मधून चोरटी वाळू वाहतूक करत असताना कॅनॉलच्या खड्डयांमध्ये पिकअप पलटी झाली.
या घटनेत दोन मजूर आणि गाडीचालक असे तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर एक मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. तिघांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले तर एक जणाला खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
Read More मन की बात : भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना चोख उत्तर मिळाले