25.1 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home महाराष्ट्र पिंपरी : दिवसभरात तब्बल 52 जणांचा मृत्यू; नव्या 987 रुग्णांची भर

पिंपरी : दिवसभरात तब्बल 52 जणांचा मृत्यू; नव्या 987 रुग्णांची भर

एकमत ऑनलाईन

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाने हाहाकार उडविला असून, आजपर्यंतचे सर्वाधिक बळी गेल्या 24 तासांत करोनामुळे गेले आहेत. तर दिवसभरात 987 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 69 हजार 423 इतका झाला असून, आतापर्यंत 1496 जणांचा बळी गेला आहे.

शुक्रवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (शनिवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 984 जणांना तर शहराबाहेरील 3 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर गेल्या 24 तासांत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 25 जण शहरातील असून 27 जण शहराबाहेरील आहेत. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 1134 वर पोहोचला असून शहराबाहेरील 362 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 1496 ची संख्या आज गाठली.

गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील पिंपरी, आकुर्डी, चिंचवड, पिंपळे गुरव, चिखली, भोसरी, किवळे, दिघी, फुगेवाडी, निगडी, रावेत, मोशी आणि बोपखेल येथील 25 रहिवाशांचा समावेश आहे. तर शहराबाहेरील गोखलेनगर (पुणे), खेड, चिंबळी, वानवडी, लोहगाव, कोथरूड, सातारा, आळेफाटा, जुन्नर, औंध, कर्वेनगर, शिरोळी येथील 27 जणांचा समावेश आहे.

आतापर्यंत शहरातील 54 हजार 432 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 3785 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 903 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 1962 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेले 4113 जण महापालिकेच्या विविध रुग्णांलयांमध्ये दाखल झाले आहेत. तर शहरातील 5444 आणि शहराबाहेरील 1153 जणांवर पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या