मुंबई : मान्सूनच्या चार महिन्यांनी दिलेल्या दणक्यानंतर हिटचा ऑक्टोबरही पावसाचा ठरला; आणि आता देशासह राज्याला, मुंबईला थंडीची चाहूल लागली असून, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली घसरला आहे. १ नोव्हेंबर रोजी मुंबईचे किमान तापमान २१ अंश नोंदविण्यात आले असून, पवई आणि बोरीवलीसह उपनगरात बहुतांश ठिकाणी किमान तापमान २० अंशाखाली नोंदविण्यात आले आहे. दुसरीकडे ऑक्टोबर सरतानाच श्रीनगरचे किमान तापमान ०.१ ते ०.२ अंश नोदविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण सर्वसाधारणरित्या ऑक्टोबरच्या उत्तर्धात श्रीनगरचे किमान तापमान खाली उतरत नाही.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमधील पावसाचा विचार करता मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाठ्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. पुण्यात सर्वाधिक पाऊस कोसळला आहे. त्या मानाने विदर्भात कमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून आता ब-यापैकी संपला असून, मुंबईसह राज्याला थंडीची चाहूल लागली आहे. मुंबईच्या किमान तापमानात आता घसरण नोंदविण्यात येत असली तरी अद्याप थंडीला येथे म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही. मात्र येत्या काळात मुंबई राज्यात पारा ब-यापैकी खाली येईल, असा अंदाज लावला जात आहे.
मराठवाड्यात २० अंशाच्या आत तापमान
मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आजवरचे तापमान २० अंशाच्या आत असून, यावर्षी मराठवाड्यात पाऊस ब-यापैकी पडला असल्याने आणखी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे़
किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
मराठवाडा
मालेगाव १८.८
बीड १८.५
नांदेड १६.५
उस्मानाबाद १८.४
परभणी १६.५
जालना १९.२
इतर ठिकाणी
माथेरान २०
डहाणू २१.६
सांगली २१.१
नाशिक १६.६
बारामती १८.५
सातारा १९.२
कोल्हापूर २१.५
पुणे १७.१
सोलापूर १९.२
मुंबई २१
झारखंडमध्ये शिष्यवृत्ती घोटाळा