23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात १ जुलैपासून प्लास्टिक बंदी

कोल्हापुरात १ जुलैपासून प्लास्टिक बंदी

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात १ जुलैपासून प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असलेल्या ‘सिंगल युज प्लास्टिक’ची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित उत्पादकांवर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादकांनाच निर्मिती केलेल्या उत्पादनाची विल्हेवाट किंवा पुनर्वापर करून घ्यावा लागेल. याला सक्षम पर्याय निर्माण होत नाही तोवर विल्हेवाट लावण्याची जबाबदारी उत्पादकांची असणार आहे.

राज्यासह देशभरात १ जुलैपासून ‘सिंगल युज प्लास्टिक’वर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमण्यात आला. त्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

यानंतरही उल्लंघन करणा-यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून पाहणी करण्यात आल्यानंतर ‘सिंगल युज प्लास्टिक’ची गुजरातमध्ये निर्मिती होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित उत्पादकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एका अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
याबाबत काय कारवाई केली याचा तपशील संबंधित नोडल अधिका-यांना दर १५ दिवसांनी भरावा लागेल.

लगेच कारवाई नको
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिका-यांसमवेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बैठक घेतली. यावेळी मंडळाचे अधिकारी प्रमोद माने यांनी ‘सिंगल युज प्लास्टिक’बाबत मार्गदर्शन केले. यावेळी उद्योजकांनी ‘सिंगल युज प्लास्टिक’ला आम्ही पाठिंबा देत आहोत, पण लगेच कारवाई करू नये, मुदत देण्यात यावी. अशी भूमिका मांडली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या