19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeमहाराष्ट्रधुळ्यात आंदोलनास जाणारे मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

धुळ्यात आंदोलनास जाणारे मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

एकमत ऑनलाईन

धुळे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य शासनाला मशिदीवरील भोंगे काढण्याचा अल्टिमेटम दिलेला असल्यामुळे आज धुळे शहरात आंदोलनासाठी जात असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य शासनाच्या आणि पोलिस प्रशासनाच्या कोणत्याही दडपणाला बळी पडणार नसल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे पर्यंत महाराष्ट्रातील मशिदीवरील भोंगे उतरविण्याचा इशारा दिला होता. भोंगे न उतरविल्यास मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते.

राज ठाकरेंच्या आदेशानुसार धुळ्यातील मनसेच्या पदाधिका-यांनी देवपुरातून मोगलाई येथील मशिदीच्या समोर आंदोलनाचा प्रयत्न केला. शहरातील शिवतीर्थ या चौकात पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवले. यावेळी घोषणा देत हातात भोंगा घेत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच राज्य सरकारच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध नोंदविला. मोगलाईतील मशिदीकडे जाण्यापूर्वीच शहर पोलिसांनी मनसेच्या पदाधिका-यांना ताब्यात घेत शहर पोलिस स्टेशन येथे आणले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या