22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्र३ जहाल नक्षलींना पोलिसांनी केली अटक

३ जहाल नक्षलींना पोलिसांनी केली अटक

एकमत ऑनलाईन

गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड अंतर्गत लाहेरी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कोयार जंगल परीसरात रविवार (ता. २८) पोलिसांनी तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक केली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथक (सी-६०) व सीआरपीएफ बटालियन ३७ चे जवान संयुक्त नक्षलविरोधी अभियान राबवित असताना २ जहाल नक्षलवाद्यांना, अटक तसेच उपविभाग हेडरी अंतर्गत पोमके गट्टा हद्दीतील झारेवाडा जंगल परीसरात विशेष, अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना १ जहाल नक्षलवाद्यास अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले आहे.

नक्षलवाद्यांना दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अटक करण्यात आली असून कोयार जंगल परीसरामध्ये अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलवाद्यांमध्ये रमेश पल्लो ( वय-२९) रा. कोयार ता. भामरागड, तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी ( वय २३) रा. पद्दुर ता. भामरागड जि. गडचिरोली यांचा समावेश आहे. झारेवाडा जंगल परीसरामध्ये अटक केलेल्या नक्षलवाद्याचे नाव अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे (वय २७) रा. झारेवाडा ता. एटापल्ली असे आहे.
अटक सदस्यांबाबत माहिती

नामे-रमेश पल्लो
दलममधील कार्यकाळ
१) सन २०१९ मध्ये भरती होवुन कंपनी १० चा अ‍ॅक्शन टिम मेंबर व स्कॉऊट टिम मेंबर म्हणुन कार्यरत होता.
२) सद्या सन २०२१-२२ मध्ये तो स्कॉऊट टिम मेंबर म्हणुन कार्यरत होता.
कार्यकाळात केलेले गुन्हे
१) त्याचा ३ खून, ८ चकमक, १ जाळपोळ, १ इतर अशा एकुण १३ गुन्ह्रामध्ये समावेश आहे.
नामे-तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी

दलममधील कार्यकाळ
१) सन जुलै २०१५ मध्ये ती नक्षलमध्ये भरती झाली.
२) सन २०१६ ते २०१९ पर्यंत ती प्लाटुन क्र ७ मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती.
३) सन २०१९ ते आतापर्यंत ती कंपनी क्र. १० मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती

कार्यकाळात केलेले गुन्हे
१) तिचा ४ खून व ३ चकमक अशा एकुण ७ गुन्ह्रामध्ये समावेश आहे.
नामे अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे
दलममधील कार्यकाळ
१) सन २०१० साली पेरमिली दलम सदस्य पदावर भरती होवुन २०१३ पर्यंत कार्यरत होता.
२) सन २०१३ पासुन प्लॉटुन क्र. १४ मध्ये कार्यरत होता.
३) ऑगस्ट २०१३ मध्ये सिरोंचा दलममध्ये बदली होवुन २०१८ पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होता.
४) मे २०१८ पासुन ते आजपर्यत तो भामरागड दलममध्ये कार्यरत होता.

कार्यकाळात केलेले गुन्हे
१) त्याचा ७ खुन, ९ चकमक, २ जाळपोळ, २ दरोडा, १ जबरी चोरी व इतर ३ अशा एकुण २४ गुन्हयामध्ये समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले बक्षीस
१) रमेश पल्लो याचेवर ४ लक्ष रूपये.
२) तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी हीचेवर ४ लक्ष रूपये.
३) अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे याचेवर २ लक्ष रूपये

आतापर्यंत ५७ जण जेरबंद…
गडचिरोली पोलिस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे सन २०२१-२२ या दोन वर्षाच्या कालावधीत आतापर्यंत एकुण ५७ जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश मिळाले आहे. सदरची कारवाई. पोलिस अधीक्षक. अंकित गोयल. यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलिस अधीक्षक (अभियान)सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन). समीर शेख., अपर पोलिस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा. यांचे नेतृत्वात पार पडली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या