24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रपोलिसांच्या श्वानाचे राज ठाकरेंनी पुरवले लाड

पोलिसांच्या श्वानाचे राज ठाकरेंनी पुरवले लाड

एकमत ऑनलाईन

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौ-यावर रवाना झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी राज ठाकरे दौ-यावर निघाले आहेत. या दौ-याच्या दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यामधून त्यांचे श्वानप्रेम पुन्हा एकदा दिसून आले आहे.

राज ठाकरे ट्रेनने विदर्भ दौ-यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी विदर्भ एक्सप्रेसमध्ये सुरक्षा तपासणीसाठी पोलीस आपल्या दलातल्या लॅब्राडोर जातीच्या कुर्त्यासह आले होते. यावेळी त्या कुर्त्याला राज ठाकरे यांनी आपल्या जवळ बसवून घेतले. तसेच पोलिसांकडे या कुर्त्याची चौकशीही केली. त्याला आराम मिळतो ना, जेवण वेळेत दिलं जातं ना, अशी चौकशीही राज ठाकरेंनी केली. शिवाय या कुर्त्याची काळजी घेताना काय करावं, काय करू नये याबद्दलही राज ठाकरेंनी थोडक्यात सूचना दिली.

राज ठाकरेंचं श्वानप्रेम सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यांच्या घरात त्यांचा लाडका जेम्स नावाचा कुत्रा होता. जेम्सच्या निधनानंतर आता त्यांच्याकडे मुफासा आणि ब्लू असे दोन कुत्रे आहेत. जेम्सच्या निधनानंतर राज ठाकरेंनी स्वत: स्मशानभूमीत जाऊन त्या कुर्त्यावर अंत्यसंस्कार करत त्याला निरोप दिला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या