30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeमहाराष्ट्रपोलिस निरीक्षक सुनील मानेंना अटक

पोलिस निरीक्षक सुनील मानेंना अटक

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने सुनील माने यांना बेड्या ठोकल्या आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे, रिजाझुद्दीन काजी त्यानंतर मुंबई पोलिस विभागातील तिसºया पोलिस अधिकाºयाला अटक एनआयए केली आहे. सुनील माने हे मुंबईतील कांदिवली गुन्हे शाखा कक्ष ११ चे माजी पोलिस निरीक्षक आहेत. सध्या त्यांची सशस्त्र पोलिस दलात बदली करण्यात आली होती.

मनसुख हत्येचा तपास दहशतवाद विरोधी पथक करत असताना मानेंची काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. आता सुनील मानेंना एनआयएने अटक केली आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना कांदिवली क्राईम ब्रांचमधून तावडे नावाच्या पोलिसाचा फोन आला असल्याचा दावा केला होता. त्यानंतर चौकशीसाठी पतीला बोलावले म्हणून गेले ते परत आलेच नाही, असे त्यांनी सांगितले होते़

वाझेंचे सहकारी एपीआय काझीही अटकेत
सचिन वाझेंचे सहकारी एपीआय रियाजुद्दीन काझी यांना ११ एप्रिलला एनआयएकडून अटक करण्यात आली. अँटिलीया प्रकरण आणि मनसुख हिरण प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. काजी यांची अनेक वेळा एनआयए अधिकाºयांनी चौकशी केली होती. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्या प्रकरणी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर एनआयएने काझी यांची चौकशी सुरु केली होती.

..आणि ६० रुग्णांचे प्राण वाचले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या