33.9 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home महाराष्ट्र अपघातग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी राज्यात पोलिसांची ‘हायवे मृत्युंजय योजना’

अपघातग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी राज्यात पोलिसांची ‘हायवे मृत्युंजय योजना’

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील विविध महामार्गांवर वाहनचालक शिस्त पाळत नाहीत. त्यामुळे अनेक अपघात होतात. अनेकांचा जीव जातो. मात्र आता महामार्गांवर होणाºया अपघातातील जखमींचा जीव वाचवण्यासाठी आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण राज्यात हायवे मृत्युंजय योजना राबविली जाणार आहे. तशी घोषणा राज्य वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे. महामार्गांवर होणाºया अपघातातील जखमींना तात्काळ मदत मिळावी यासाठी महामार्ग परिसरातील ठराविक स्थानिकांना ‘मृत्युंजय देवदूत’ हे नाव देण्यात येणार आहे.

ज्या स्थानिकांना ‘मृत्युंजय देवदूत’ हे नाव दिले जाईल ते सरकारी व्यवस्थेशी जोडले जातील आणि अपघातग्रस्तांना मदत मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असेल. मृत्युंजय देवदूतांना अपघातग्रस्तांच्या तात्काळ मदतीसाठी लागणारे स्ट्रेचर, फर्स्ट एड बॉक्स आणि इतर साहित्यही दिले जाणार. आरोग्य विभागातर्फे राबवण्यात येणाºया स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती मृत्युंजय देवदूत अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणार. महामार्ग सुरक्षा पथकाकडून मृत्युंजय देवदूतांना ओळखपत्रही देण्यात येणार. त्याचबरोबर चांगले काम करणाºया देवदूतांचा राज्य सरकारच्या रस्ते सुरक्षा विभागाकडून सन्मानही केला जाणार

रस्ते अपघातात हजारो मृत्युमुखी
२०२० चा विचार केला तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी रस्ते अपघातात तब्बल ११ हजार ५४२ जणांचा मृत्यू झाला आहे. तशी माहिती रस्ते वाहतूकमंत्री अनिल परब यांनी १८ जानेवारी २०२१ रोजी दिली आहे. २०२० मध्ये महाराष्ट्रात एकूण २५ हजार ४५६ अपघातांची नोंद झाली. त्यात ११ हजार ४५२ जणांनी आपले प्राण गमावले. ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी व्यक्त केले होते. जानेवारीमध्ये रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी वाहनचालकांना ‘यमाला रोखण्यासाठी संयम बाळगा आणि नियम पाळा’ असे आवाहन केले होते. दरम्यान, २०२० मध्ये कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघातांची संख्या कमी झाली होती.

२०१९ ची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रात एकूण ३२ हजार २९५ अपघातांची नोंद झाली होती. त्यात १२ हजार ७८८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रस्ते अपघातातील मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी रस्ते वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात सामान्य नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार असल्यामुळे या उपक्रमाकडे राज्याचे लक्ष लागले असेल.

नियम सर्वाना सारखेच, पोहरादेवी येथील गर्दीबाबत तात्काळ कारवाई करावी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,445FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या