22.6 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeमहाराष्ट्रपोलिस भरतीचे संकेतस्थळ वारंवार होतेय हँग

पोलिस भरतीचे संकेतस्थळ वारंवार होतेय हँग

एकमत ऑनलाईन

मुंबई : नुकत्याच जाहीर झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या ज्या साईटवर उमेदवारांना अर्ज भरायचे आहेत ती साईटच व्यवस्थित चालत नसल्याने विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. ब-याच दिवसानंतर पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी मोठी मेहनत घेऊन भरतीची तयारी केली असली तरी आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी साईट चालत नसल्याने विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेवरच रात्र जागून काढावी लागत आहे.

अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप रजिस्ट्रेशन झाले नसून काही विद्यार्थ्यांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी आता पोलिस भरतीची ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख वाढवून देण्याची मागणी सरकारकडे आहेत. पोलिस भरतीचे ऑनलाइन फॉर्म भरणा-या विद्यार्थ्यांना साईट चालत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या ज्या साईटवर उमेदवारांना अर्ज भरायचे आहेत ती साईटच व्यवस्थित चालत नसल्याने विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रात्रभर ताटकळत बसण्याची वेळ
ब-याच दिवसानंतर पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी मोठी मेहनत घेऊन भरतीची तयारी केली केली आणि आता याच भरतीची ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी साईट चालत नसल्याने विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेवरच रात्र जागून काढावी लागत आहे.

अनेकांची नोंदणीच झाली नाही
साईट व्यवस्थित चालत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप रजिस्ट्रेशनही झाले नाही. तर काही विद्यार्थ्यांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकल्याने अर्ज सबमिट होत नसल्याने विद्यार्थ्यांचीचिंता वाढली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी आता पोलीस भरतीची ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख वाढवून देण्याची मागणी करत आहेत.

चार दिवसांचा वेळ शिल्लक
नऊ नोव्हेंबर पासून पोलिस भरती करणारे विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरत आहेत. याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर असून आता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी फक्त चार दिवसांचा अवधी बाकी आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याच्या या साईटमध्ये जर बदल नाही झाला तर अनेक विद्यार्थी आपला अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी तारीख वाढवून देण्याची मागणी करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या