16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रअडगळीतील अधिका-यांचे सत्तांतरानंतर पुनर्वसन

अडगळीतील अधिका-यांचे सत्तांतरानंतर पुनर्वसन

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाविकास आघाडीच्या सत्तांतरानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने कार्यभार स्वीकारताच सनदी अधिका-यांच्या बदलीसाठी कंबर कसली आहे. त्यापैकीच एक मोठी बदलीची खांदेपालट नुकतीच पार पडली. गेल्या अनेक दिवसांपासून चातक पक्षाप्रमाणे वाट पाहणा-या काही सनदी अधिका-यांनी या सत्तांतराच्या गंगेत आपले घोडे न्हाऊन घेतले.

दिपक कपूर यामध्ये अपवाद नाहीत. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असणा-या दिपक कपूरांना आपल्या प्रदीर्घ प्रतिक्षेचे अतिशय उत्तम फळ लाभले आहे. सनदी अधिका-यांच्या नेमणुकांमध्येही दोन्हीही अडगळीच्या पोस्टिंगचा वनवास कपूर यांच्या नशीबी महाविकास आघाडीच्या काळात आला.

अखेर नव्या सरकारने केलेल्या ४४ अधिका-यांसोबत दीपक कपूर यांचीही वर्णी लावली. तुलनेने अतिशय चांगली पोस्टिंग समजल्या जाणा-या जलसिंचन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पोस्टिंग मिळाली. अर्थात फडणवीसांच्या मर्जीत असलेल्या परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात साईड किंवा कमी महत्वाच्या विभागात पोस्टिंग मिळालेले दीपक कपूर हे एकमेव अधिकारी नाहीत. ही यादी बरीच मोठी आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या