22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रउमेश कोल्हेंचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जारी

उमेश कोल्हेंचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जारी

एकमत ऑनलाईन

अमरावती : अमरावती मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. उमेश कोल्हे यांच्यावर आरोपींनी ज्याप्रकारे हल्ला केला, त्यात उमेश कोल्हे यांच्या मेंदूची नस, श्वास नलिका, अन्ननलिका, डोळ्याची रक्तवाहिनीला चाकूने हल्ला केल्याने इजा झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

पोस्टमॉर्टममध्ये ही जखम ५ इंच रुंद, ७ इंच लांब आणि ५ इंच खोल असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. इरफान खान असं त्याचं नाव असून तो एक एनजीओ चालवतो.

या प्रकरणी पोलिसांनी आधीच सहा जणांना अटक केली आहे. इरफान खानची अटक ही अमरावती पोलिसांची मोठी कारवाई समजली जाते. इरफान खान याला आज अमरावती न्यायालयात हजर करण्यात आले, त्याला ७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आरोपी यूसूफ खान आणि उमेश कोल्हे यांचे कौटुंबिक संबंध होते. विशेष म्हणजे यूसूफ खान कोल्हेंच्या अन्त्यविधीलाही हजर होता.

नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान खानला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान खान हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी २१ जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या