25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeमहाराष्ट्रएमपीएससी परीक्षा पुढे ढकलणार?

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, यासाठी खा. संभाजीराजे, आ. विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक घेतली. तब्बल दीड ते दोन तास सुरू असलेल्या या बैठकीतनंतर खा. संभाजीराजे आणि शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांनी एमपीएससी परीक्षा रद्द करण्याबाबत आम्ही आमचे म्हणणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडले आहे. मुख्यमंत्रीदेखील याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे, असे म्हटले.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत २० मुद्यावर चर्चा झाली. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे विनायक मेटेंनी सांगितले. एमपीएससी परीक्षेबाबत आजच निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे पुन्हा बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात येईल, असे चित्र आहे. मात्र, जर परीक्षा झाल्याच तर मराठा समाजासाठी मोठा आघात असेल, असेही ते म्हणाले. त्यामुळे ही परीक्षा रविवारऐवजी पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज रात्री उशिरा पुन्हा एकदा बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये नेमकी बाब स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे.

आंबेडकर यांच्या वक्तव्याचा निषेध
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरून खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जहरी टीका केली. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेनंतर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निदर्शने केली जात आहेत. नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रकाश आंबेडकर व वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या जहरी टीकेचा निषेध केला. दरम्यान, खा. संभाजीराजे यांनी आंबेडकरांचे वक्तव्य अशोभनीय असल्याचे म्हटले.

‘आत्मनिर्भर भारत’ घातक ठरु नये!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या