25.4 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeमहाराष्ट्रएमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला, नाहीतर उधळून लावू !

एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला, नाहीतर उधळून लावू !

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.७ (प्रतिनिधी) रविवारी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीसाठी मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा आरक्षणाला स्थगिती आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा घेण्याची घाई सरकार कशासाठी करतं आहे ? वयाच्या मर्यादेमुळे काही लोकांचे नुकसान होईल असे वाटत असेल तर सरकारने वयोमर्यादा वाढवावी. रविवारी होणारी परीक्षा सरकारने पुढे ढकलली नाही तर आम्हाला एमपीएससीचे केंद्र बंद करून परीक्षा रोखवी लागेल असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती
दिल्याने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा वणवा हळूहळू पेटत चालला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्यभरातल्या मराठा संघटनांच्या प्रतिनिधींची आज नवी मुंबईत बैठक झाली. या बैठकीमध्ये खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्यासह मराठा समाज संघटनांचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षण आणि रविवारी होणाऱ्या एमपीएससी परीक्षाबाबत सविस्तर चर्चा झाली. संभाजीराजे त्यांनी व बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नरेंद्र पाटील यांनी सरकारला मराठा तरुणातील अस्वस्थतेची दखल घेतली नाही तर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. आरक्षणाला स्थगिती आलेली असताना एमपीएससीची परीक्षा घेतल्यास मराठा समाजाचे खुप मोठे नुकसान होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आधी पोलीस भरती आणि आता एमपीएससी यामुळे मराठा समाजात असंतोष आहे. राज्य सरकारने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत. यूपीएससीची परीक्षा झाली तेव्हा नवी मुंबईतल्या एका सेंटरमध्ये फक्त १५० विद्यार्थी उपस्थित होते. म्हणजेच कोरोनामुळे काही मुलं परीक्षेला येऊ शकली नाही, काही आजारी पडली. तसाच प्रकार एमपीएससीबाबत होणार आहे. मुख्यमंत्री म्हणतात आम्ही मराठा समाजासोबत आहोत. त्यामुळे एमपीएससी परीक्षा मुख्यमंत्र्यांनी पुढे ढकलावी, अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी यावेळी केली. सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला नाही तर मराठा क्रांती मोर्चाचे सर्व कार्यकर्ते राज्यभरातल्या एमपीएससी केंद्रांवर धडक देतील. कोणत्याही परिस्थितीत रविवारी होणारी परीक्षा होऊ दिली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

सर्वांना सोबत घेऊन चला अशी माझी सरकारला सूचना आहे,पण राज्य सरकार ऐकत नसेल तर मराठा समाज एमपीएसीची केंद्रं बंद करेल असा इशारा संभाजीराजेंनी दिला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा झाली तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. सिद्धार्थ शिंदे नावाचा वाईचा मुलगा आहे. सध्या करोना बाधित आहे तो कसा परीक्षा देणार? असाही प्रश्न खासदार संभाजीराजेंनी विचारला आहे. परीक्षेला बसणारी दोन लाख मुलं करोनाबाधित झाली तर त्याला कोण जबाबदार आहे असा सवाल त्यांनी केला.

नव्या २०९ बाधितांची भर ; ७ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या