22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यावर पुन्हा वीजसंकट

राज्यावर पुन्हा वीजसंकट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय यंत्रणेकडील थकबाकीच्या कारणावरून राज्यावर पुन्हा वीजसंकट येण्याची आशंका निर्माण झाली असून केंद्र सरकारच्या पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (पॉसोको) तीन प्रमुख केंद्रीय वीज वितरण कंपन्यांना, महाराष्ट्रासह १३ राज्यांमधील २७ वीज वितरण कंपन्यांनी लाखो कोटी रूपयांची वीज थकबाकी न भरल्यास त्यांच्या वीजपुरवठा व तत्सम व्यवहारांवर बंदी घालावी असे सांगितले आहे. यासाठी शुक्रवार दि. १९ ऑगस्ट हीच डेडलाईन देण्यात आली होती आणि ती आता संपली आहे.

दरम्यान महाराष्ट्र सरकारने केंद्राकडील थकबाकीबाबत तातडीने संपर्क साधला असून आवश्यक त्या कार्यवाहीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र केवळ राज्याच्या शब्दावर विसंबून पॉसोको प्रस्तावित कारवाई थांबविणार काय, याचे स्पष्टीकरण झालेले नाही. केंद्र सरकारच्या मालकीच्या इंडियन एनर्जी एक्सचेंज, पॉवर एक्सचेंज ऑफ इंडिया आणि हिंदुस्थान पॉवर एक्सचेंज या तिन्ही वीज वितरण कंपन्यांकडे संबंधित राज्यांमध्ये वीजनिर्मिती करणा-या कंपन्यांची प्रचंड मोठी थकबाकी आहे. या राज्यांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे. दिल्लीच्या श्रम शक्ती भवनातील केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत पॉसोको तर्फे देशातील वीजनिर्मिती यंत्रणांच्या एकात्मिक कार्याचे व्यवस्थापन केले जाते.

स्थगितीची सूचना जारी
पॉसोकोने तिन्ही प्रमुख वीज वितरण कंपन्यांना एक पत्र लिहीले आहे. त्यात म्हटले आहे की या १३ राज्यांमधील २७ वितरण कंपन्यांनी थकबाकी न भरल्यास देशातील उर्जा बाजारपेठेतील सर्व उत्पादनांचे खरेदी-विक्री/वितरण करण्याचे त्यांचे व्यवहार १९ ऑगस्ट २०२२ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित-बंद करण्यात यावेत.

बंदी घालण्याची शक्यता
सार्वजनिक क्षेत्रातील वीज वितरण कंपन्यांसह बाजारपेठेत उर्जा साधनांचे उत्पादन करणा-या कंपन्यांवरही थकबाकी न भरल्यास बंदी घातली जाऊ शकते. संबंधित राज्यांनी थकबाकी भरण्याबाबत अर्थसुरक्षा व्यवस्था-प्रणाली ठेवली असेल किंवा संबंधितांच्या अनुपस्थितीत आगाऊ रक्कम भरली गेली असेल तरच या १३ राज्यांना वीज पुरवठा केला जाईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या