25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रप्रकाश आमटे यांना ब्लड कॅन्सर

प्रकाश आमटे यांना ब्लड कॅन्सर

एकमत ऑनलाईन

पुणे : सुप्रसिद्ध समाजसेवक प्रकाश आमटे यांना दुर्मीळ हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरचे निदान झाले. त्यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकाश आमटे यांना हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरसोबतच न्यूमोनियाच्या संसर्गामुळे गेल्या १० दिवसांपासून खूप ताप आहे. पुणे येथील दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चाहते तसेच लोकांनी फोन करून डिस्टर्ब न करण्याची विनंती मुलगा अनिकेत व कुटुंबीयांनी केली आहे. सध्या त्यांच्यावर न्यूमोनियावर उपचार सुरू आहेत. येत्या २ किंवा ३ आठवड्यांनंतर, शरीराची ताकद वाढल्यानंतर रक्त कर्करोगाचा उपचार सुरू होऊ शकतो.

केसाळ पेशी ल्युकेमिया हा रक्ताचा एक दुर्मीळ, हळूहळू वाढणारा कर्करोग आहे. यामध्ये अस्थिमज्जा खूप जास्त म्हणजे अतिरिक्त पांढ-या पेशींची निर्मिती (लिम्फोसाइट्स) करते. एरव्ही या पांढ-या पेशी म्हणजे सैनिक पेशी शरीरातील रोगजंतूंशी लढतात. पण अतिरिक्त निर्मितीमुळे रोग प्रतिकारक यंत्रणेत त्या तारकऐवजी मारक ठरतात. या अतिरिक्त पांढ-या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली केसासारख्या दिसतात.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या