22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeमहाराष्ट्रप्रकाश शेंडगे : आम्ही मराठा समाजासोबत, मात्र ओबीसी मधून त्यांना आरक्षण नको

प्रकाश शेंडगे : आम्ही मराठा समाजासोबत, मात्र ओबीसी मधून त्यांना आरक्षण नको

एकमत ऑनलाईन

येत्या 8 ऑक्टोबरला ‘ओबीसी आरक्षण बचाव’ आंदोलन केलं जाणार

मुंबई : ‘जे मराठा समाजाला दिलं जात आहे, तसे लाभ ओबीसी समाजाला दिले पाहिजेत,’ अशी मागणी माजी आमदार आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 8 ऑक्टोबरला ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन केले जाणार आहे. यावेळी ओबीसी समाज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करेल, असे प्रकाश शेंडगे म्हणाले.

‘ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा आरक्षण द्यावे अशी मागणी काही नेते करत आहेत. या मागणीमुळे ओबीसी समाजात जे छोटे समाज ते भयभीत झाले आहेत. त्यामुळे हे सर्व चुकीचे सुरू आहे. यामुळे मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजात वाद निर्माण केला जात आहे,’ असेही प्रकाश शेंडगेंनी सांगितले.

‘त्या पार्श्वभूमीवर येत्या 8 ऑक्टोबरला ‘ओबीसी आरक्षण बचाव’ आंदोलन केलं जाणार आहे. हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात येणार असून त्यांना निवेदन देण्यात येईल. त्यानंतर पुढच्या टप्पातील आंदोलन हे तहसीलदार कार्यालय समोर केले जाईल, ज्याची तारीखनंतर जाहीर केली जाईल,’ असेही प्रकाश शेंडगेंनी सांगितले.

तसेच मराठा समाजाला जे लाभ दिलं जात आहे, ते आणि तसेच लाभ ओबीसी समाजाला दिले पाहिजेत, अशीही आमची मागणी आहे. त्याशिवाय राज्यात सद्यस्थितीत सुरु असलेली मेगाभरती थांबवली पाहिजे, अशीही आमची मागणी आहे. आम्ही मराठा समाजाबरोबर आहोत. ओबीसीला वेगळं आरक्षण द्या, अशी मागणी आम्ही नेहमी केली आहे, असेही प्रकाश शेंडगे यावेळी म्हणाले.

दरम्यान सर्वांचे आरक्षण रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण देण्याची मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उद्विग्न भावनेतून केली असावी, असे मत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केले होतं. राज्यातील मागासवर्गीय समाज व बारा बलुतेदारांचा जीवनासाठी संघर्ष अजूनही सुरुच आहे. त्यामुळे आरक्षण रद्द करुन चालणार नाही, असंही प्रकाश शेंडगे म्हणाले होते.

धर्माबाद येथील मालमत्ता करमुल्यांकनचे प्रस्ताव धुळखात, पालिकेचा करोडो रुपयांच्या महसुलावर पाणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या