24.8 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeमहाराष्ट्रप्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीने कोणतीही जबाबदारी सोपवलेली नाही

प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीने कोणतीही जबाबदारी सोपवलेली नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१२(प्रतिनिधी) देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट व्हावी अशी शरद पवार यांची इच्छा आहे व त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू असतात. मात्र यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे कोणतीही जबाबदारी सोपवलेली नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज स्पष्ट केले.

प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू झाले होते. भाजपा विरोधात प्रबळ प्रादेशिक पक्षांची मोट उभारण्याचा शरद पवार व प्रशांत किशोर यांचा प्रयत्न असल्याचीही चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज या भेटीबाबत स्पष्टीकरण केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे दिलेली नाही. किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा मोठा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे? याबद्दल प्रशांत किशोर यांनी शरद पवारांबरोबर चर्चा केली. देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा शरद पवारांची इच्छा आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते, मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपाच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

लातूर शहर व परिसरात पावसाची दमदार हजेरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या