23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रप्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी

प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेतून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. एक-एक करत आमदारांसह खासदारांनीही शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली.

प्रताप सरनाईक यांनी आग्रहाने शिंदे गटाची बाजू लावून धरली त्यानंतर आता शिवसेनेकडून त्यांच्या मुलावर कारवाई करण्यात आली आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सरनाईकांच्या बंडामुळे आता पूर्वेश यांच्यावरही कारवाई झाल्याचे दिसतेय. त्यांच्यासोबतच सहसचिव किरण साळी यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी नव्या पदाधिका-यांची नियुक्ती केली जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या