22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रप्रताप सरनाईकांनी दिली दोन लाख लोकांच्या जेवणाची ऑर्डर

प्रताप सरनाईकांनी दिली दोन लाख लोकांच्या जेवणाची ऑर्डर

एकमत ऑनलाईन

ठाणे : शिंदे गटाने उद्या होणा-या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी केली आहे. बीकेसीवर एकाच वेळी लाखो लोक बसतील अशी सुविधा करण्यात आली आहे. या मेळाव्याला येणा-यांसाठी बसगाड्या, चारचाकी वाहने आणि ट्रेनही बुक करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय मेळाव्याला येणा-यांसाठी खाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर तब्बल दोन लाख लोकांच्या जेवणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या दृष्टीने प्रताप सरनाईक यांनी तयारीही केली असून ठाण्यातील एका मराठी व्यावसायिकालाच दोन लाख लोकांच्या जेवणाची ऑर्डर दिली आहे.

प्रताप सरनाईक यांनी मीडियाशी संवाद साधताना उद्याच्या तयारीची माहिती दिली. दसरा मेळाव्यासाठी खेडेगावातून येणा-या दोन लाख लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या मराठी व्यावसायिकाला जेवणाची ऑर्डर देण्यात आली आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. मेळाव्याला येणा-यांसाठी चांगल्या प्रकारचे धपाटे, चटणी, कचोरी आणि गोड पदार्थ देण्यात येणार आहे. खाद्यपदार्थ खराब होऊ नये अशा पद्धतीने हा मेनू तयार करण्यात आला आहे. प्रशांत कॉर्नरच्या मालकानेही दोन लाख लोकांच्या जेवणाचे शिवधनुष्य उचलले असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्याच्या मेळाव्याला ग्रामीण भागातून लोक येणार आहेत. बीकेसी मैदानावर अनेक शिवसैनिक बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचाराचं सोनं लुटण्यासाठी येणार आहेत. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार घेऊनच एकनाथ शिंदे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत. ट्रीझरमध्ये म्हणूनच आम्ही शिंदे यांचे स्वत:चे विचार न मांडता बाळासाहेबांचेच विचार मांडले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

९ जून २०२१ मध्ये मी उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते. भाजपबरोबर आपण युती करून लढलो. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जाऊ नका असे बाळासाहेबांनीच सांगितलेहोते. पण माझ्या पत्राची दखल घेतली गेली नाही. फक्त एकनाथ शिंदे यांनी माझ्या पत्राची दखल घेतली. त्यानुसार त्यांनी भाजपशी युती करून राज्याची धुरा सांभाळली, असेही ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या