22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडे समर्थकांनी प्रवीण दरेकर यांचा ताफा अडविला

पंकजा मुंडे समर्थकांनी प्रवीण दरेकर यांचा ताफा अडविला

एकमत ऑनलाईन

बीड : भाजपने राज्यसभेसाठी पंकजा मुंडेंना डावलल्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी अत्यंत आक्रमक अशी भूमिका घेतली आहे. आज विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा ताफा बीड-उस्मानाबाद सीमेवरती रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.

पारगाव या ठिकाणी प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला आहे. इतकंच नाही तर दरेकर यांच्याविरोधात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थक पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत दिसून आले.

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे सध्या बीड दौ-यावर आहेत. मात्र, या दौ-यादरम्यान बीड-उस्मानाबाद सीमेवर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांचा ताफा अडवत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. सध्या बीड जिल्ह्यात पंकजाताई यांना भाजपने डावलल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष पहायला मिळतोय.

भाजपमध्ये पंकजा मुंडेंवर सतत होणारा अन्याय पाहता पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र, आज प्रवीण दरेकर हे बीड दौ-यावर असताना उस्मानाबाद बीड सीमेवर त्यांचा ताफा अडवून भाजप विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या