24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात डिसेंबरपूर्वी राष्ट्रपती राजवट ! - प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्रात डिसेंबरपूर्वी राष्ट्रपती राजवट ! – प्रकाश आंबेडकर

एकमत ऑनलाईन

मुंबई: ‘महाराष्ट्रात डिसेंबर महिना सुरू होण्याआधी राष्ट्रपती राजवट लागू होईल’, असे भाकीत करून वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सनसनाटी निर्माण केली आहे. केंद्र विरुद्ध महाराष्ट्र सरकार या संघर्षातून केंद्रसरार हा निर्णय घेईल, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.

राज्य सरकारकडून सातत्याने केंद्राचे निर्णय धुडकावले जात आहेत. केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्याने कोणताही निर्णय घेतलेला नाही. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली आहे. शेतका्र्यांयाा हिताचे असेल तेच आम्ही स्वीकारू, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचाही या कृषी कायद्यांना ठाम विरोध आहे.

त्यावर बोट ठेवत आंबेडकर यांनी महत्त्वाचे मत मांडले आहे. राज्य सरकार सातत्याने केंद्राच्या विरोधात भूमिका घेत आहे. केंद्राचे कायदे नाकारले जात आहेत. देशात सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू आहे. अनेक निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. केंद्राने मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. सामान्यांना आजही लोकलची प्रतीक्षा आहे, असे नमूद करत आंबेडकर यांनी राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तवली.

केंद्राच्या निर्णयाला छेद देणारी भूमिका सातत्याने राज्य सरकार घेत आहे. प्रत्यक्षात घटनेनुसार राज्याला केंद्र सरकारविरोधात जाता येत नाही. पण, महाराष्ट्रात मात्र तसे घडते आहे. त्यातून एक वेगळाच संघर्ष सुरू झाला असून यातून महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीकडे ढकलला जात आहे, असे आंबेडकर म्हणाले. डिसेंबर महिना सुरू होण्यापूर्वी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. बिहार निवडणुकीनंतर ते पाऊल उचलण्यात येईल, असे भाकीतच आंबेडकर यांनी केले.

आंबेडकर एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. आंबेडकर यांच्या या भाकीताने राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटण्याचे चिन्हे आहेत.दरम्यान, प्रकाश आंबेडकर हे सातत्याने लॉकडाऊन विरोधात भूमिका घेत आहेत. लॉकडाऊन हटवायला हवे यासाठी त्यांनी अनेक प्रकारे आंदोलनही केलेले आहे. सलून बंद असताना ती उघडण्याच्या मागणीसाठी अकोला येथे आंबेडकर यांनी केस कापून घेत अभिनव आंदोलन केले होते. त्यानंतर मंदिरे व धार्मिक स्थळे उघडली जावी म्हणूनही ते सातत्याने आग्रही आहेत. पंढरपुरात मंदिरांसाठी झालेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते.

तैवानने मानले भारतीयांचे आभार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या