21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक

राज्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील तीन पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. तर उत्कृष्ट सेवेसाठी पोलिसांचा हा सन्मान करण्यात आला आहे. या तीन पदकांसह महाराष्ट्र राज्याला ८४ पोलीस पदके मिळाली आहेत. पोलीस पदकांची घोषणा १४ ऑगस्टला झाली आहे. मुंबई मुख्यालयात कार्यरत असलेले राज्य अन्वेशन विभागाचे सह आयुक्त सुनिल कोल्हे, ठाणे शहराचे सहायक पोलीस आयुक्त प्रदीप कन्नाळू आणि मुंबई ओशिवरा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.

तर महाराष्ट्रासाठी एकूण ८४ पदके जाहीर झाली आहेत. यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली असून ४२ पोलिसांना शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेसाठी 39 पोलीस पदके जाहीर झाली आहेत.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करण्यात येतात. यावर्षी देशभरातील एकूण १०८२ अधिकाऱ्यांना पोलीस पदक जाहीर झाली असून ८७ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक, ३४७ पोलिसांना पोलीस शौर्य पदक आणि ६४८ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला ८४ पदक मिळाली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या