राजापूर : अवघ्या एका दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला असताना जीवनावश्यक वस्तूंबरोबर चैनीच्या वस्तूंचे भावही गगनाला भिडलेले आहेत. बाप्पाच्या प्रसादासाठी वापरण्यात येणा-या फळांच्या दरांमध्येही गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी फारशी वाढ न होता स्थिर आहेत.
त्यामुळे सध्याच्या वाढत्या महागाईमध्ये गणेशभक्तांना एकप्रकारे दिलासा मिळताना गणेशभक्तांसाठी प्रसादाची चव अधिक अविट झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून सर्वच वस्तूंचे दर सातत्याने वाढत चालले आहे. त्यामध्ये गहू, तांदूळ, डाळी, विविध भाज्या आदी जीवनावश्यक वस्तूंबरोबर चैनीच्या वस्तूंचा समावेश आहे.
या वाढत जाणा-यादरांमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल बनले आहे. या वाढत्या महागाईमध्ये ‘बाप्पाचे’ आगमन होत आहे. बाप्पासाठी आरासासाठी वापरण्यात येर्णाया मखरांसह अन्य विविध प्रकारचे साहित्य बाजारपेठेमध्ये दाखल झाले आहे. या व्यतिरिक्त रोषणाईसाठी वापरण्यात येत असलेली विविध प्रकारची लाईटिंग आणि अन्य साहित्यही मोठ्याप्रमाणात दाखल झाले आहे.
या सा-यांच्या वाढलेल्या दरामध्ये अन् त्यातून झालेल्या महागाईमध्ये लाडक्या बाप्पाचे स्वागत कसे करणार? अशी चिंता सर्वसामान्यांना पडली आहे. मात्र श्रींच्या प्रसादासाठी वापरण्यात येत असलेल्या विविधांगी फळांचे दरही स्थिर आहे. उदा.सफरचंद १६०-१८० रू.,मोसंबी १२० रू., केळी (डझन) ५०-६० रू. आणि
नासपती २०० रू. किलो आहे.