27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रमलिकांचे डी गँगसोबत संबंध असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे ; कोर्टाचे निरीक्षण

मलिकांचे डी गँगसोबत संबंध असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे ; कोर्टाचे निरीक्षण

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने अटक केली आहे. या प्रकरणात आता नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढताना दिसून येत आहेत. या प्रकरणात नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये नवाब मलिक यांचा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर कोर्टानेसुद्धा मलिकांचे डी गँगसोबत संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे आता नवाब मलिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे दिसत आहे.

मुंबईतील गोवावाला कंपाऊंडमधील जागा हडप करण्यासाठी नवाब मलिकांनी थेट आणि जाणीवपूर्वक मनी लॉन्ड्रिंग केल्याचे पुरावे आहेत असे कोर्टाने म्हटले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर आणि सरदार खान यांच्यासोबत मलिक यांनी अनेकदा भेट घेतल्याचा दावा ईडीने केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या