22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे उद्या एकाच मंचावर

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे उद्या एकाच मंचावर

एकमत ऑनलाईन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (१४ जून) एकाच मंचावर दिसणार आहेत. मुंबईतील राजभवन इथे उद्या पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते क्रांतिकारी गॅलरीचं उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असेल.

एप्रिल महिन्यात लता मंगेशकर फाऊंडेशन पुरस्कार घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौ-यावर आले होते. त्यावेळी कार्यक्रम पत्रिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव नसल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळलं होतं. मात्र राजभवनात उद्या दुपारी चार वाजता क्रांतिकारी गॅलरीचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबई दौर-यावर येत आहेत. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहेत.

पंतप्रधान एक दिवसीय महाराष्ट्र दौ-यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसीय महाराष्ट्र दौ-यावर आहेत. त्यांचा पहिला कार्यक्रम पुण्यातील देहूमध्ये आहे. संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचं अन् शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

त्यानंतर पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. सी विद्यासागर राव राज्यपाल असताना राजभवनात एक भुयार सापडलं होतं, त्या भुयारात गॅलरी स्थापन करण्यात आली आहे. या गॅलरीमध्ये चाफेकर बंधू तसंच सावरकर बंधू यांची चित्रे आणि प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचं उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या